कांदिवली वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

61

सामना प्रतिनिधी, मुंबई

वाहतूक विभागाच्या प्रभारी पोलीस निरीक्षकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. शमशाद अहमद मोहम्मद खान आणि सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान अशी या दोघांची नावे आहेत.

कांदिवली वाहतूक विभागात विठ्ठल शिंदे हे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाडय़ांवर कारवाई करत होते. क्लिपिंग कारवाईदरम्यान शमशाद आणि सज्जादने शिंदे यांच्यासोबत वाद घातला. त्यांनी शिंदे यांना मारहाण करून जखमी केले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शमशाद आणि सज्जादविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या