धुवांधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल


सामना ऑनलाईन । मुंबई

सोमवारी सायंकाळी मुंबई आणि उपनगरांमध्ये धो धो पाऊस कोसळला. या धुवांधार पावसातही आपले कर्तव्य बजावणाऱ्या एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सत्यम यादव नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत हा व्हिडीओ चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून जवळपास १० हजार लोकांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ नक्की कोणत्या भागातील आहे हे स्पष्ट झालेले नसले तरी धुवांधार पावसात आपले कर्तव्य बजावणाऱ्या या ट्रॅफिक पोलिसाला लोकं सलाम ठोकत आहेत.