ट्रायच्या नियमांना हरताळ, उल्हासनगरात केबल ग्राहकांची लूट

14
cable-tv


सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

ट्रायने 130 रुपयांच्या पॅकेजमध्ये शंभर चॅनल फ्री दिलेले आहेत. त्यानंतर निवडीच्या चॅनलसाठी ग्राहकांना स्वातंत्र्य दिले असताना उल्हासनगरात मात्र केबलचालकांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे. ट्रायच्या नियमांना हरताळ फासला जात असून जादा रकमेची मागणी केली जात असल्याने ग्राहक संतप्त आहेत.

केबलचालकांची मक्तेदारी संपवण्यासाठी ट्रायने आपल्या आवडत्या चॅनेलसाठीच पैसे मोजण्याची योजना सक्तीने लागू केली आहे. मात्र उल्हासनगरात डेन केबल नेटवर्कने पॅकेज पद्धत लागू करून शासनाच्या आदेशाला हरताळ फसले आहे. ट्रायच्या सूचनेनुसार किमान 130 रुपयांचा बेसिक प्लॅन आहे. यानंतर स्वतःच्या मर्जीने चॅनेल निवडण्याचा ग्राहकांना पूर्ण अधिकार आहे. असे असताना उल्हासनगर आणि परिसरातील तब्बल दोन लाख ग्राहकांकडून जादा रकमेची मागणी केली जात आहे.

शिवसेनेच्या दणक्यानंतर कंपनी ताळ्यावर

या लुटीला शिवसेनेने विरोध केला असून उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, संदीप गायकवाड, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, विभागप्रमुख राजू माने, शाखाप्रमुख सुनील सिंग यांनी कोणार्क केबलच्या पवई येथील कार्यालयावर धडक केबल व्यवस्थापक कमल बठिजा यांना जाब विचारला.

आपली प्रतिक्रिया द्या