बहुचर्चित ‘द मार्व्हल्स’चा ट्रेलर लॉन्च, तीन महिला सुपरहिरो पहिल्यांदाच येणार एकत्र

बहुचर्चित मार्व्हल स्टुडियोचा ‘द मार्व्हल्स’ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता त्यांची प्रतिक्षा संपली असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कौटुंबिक मनोरंजनाची 100 टक्के हमी देणारा हा सिनेमा हिंदुस्थानात दिवाळीत प्रदर्शित होणार असून या सिनेमाचा हिंदी ट्रेलर शुक्रवारी सकाळी लॉन्च करण्यात आला.

मार्व्हल सिनेमॅटीक विश्वात पहिल्यांदाच तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून त्या सगळ्या दुष्टांचा आणि शत्रूंना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे हा सिनेमा मार्व्हल सिनेमाप्रेमींसाठी आणि सर्वसामान्य सिनेरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

या धमाकेदार अॅक्शनपॅक्ड सिनेमामध्ये अभिनेत्री ब्री लार्सन, टेयोना पॅरीस, इमान वेलानी, सॅम्युएल एल जॅक्सन, झावी अॅश्टन आणि पार्क सिओ जून यांच्या प्रमुख भूमिका आहे. निया डिकोस्टा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमााचे केविन फीग हे निर्माते आहेत. मार्व्हल स्टुडियोची निर्मिती असलेला ‘द मार्व्हल्स’ हा सिनेमा दिवाळीमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.