प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं! ‘कागर’चा ट्रेलर प्रदर्शित


सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरू अभिनित कागर या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं ही थीमलाईन या ट्रेलरसोबत प्रसिद्ध होताना दिसत आहे. गावपातळीवरील नातेसंबंध, त्याला असलेली राजकारणाची पार्श्वभूमी आणि बदलत जाणाऱ्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडी या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतात. युवराज आणि राणी नावाच्या प्रेमीयुगुलाची ही कथा आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रिंकूसह अभिनेता शुभंकर तावडेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. घोषणेपासूनच चर्चेत असलेला कागर 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा कागरचा ट्रेलर-