‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसिरीजचा ट्रेलर लाँच


सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. चार तरुणींच्या आयुष्यार आधारित या वेब सिरीजमध्ये सयानी गुप्ता, बानी जे, किर्ती कुल्हारी आणि मानवी गगरू या चार अभिनेत्री दिसणार आहे. बोल्ड आणि ब्युटिफुल या चार तरुणींच्या आयुष्याभोवती फिरणारी या वेब सिरीजची कथा आहे.

या चार अभिनेत्रींव्यतिरिक्त प्रतीक बब्बर, नील भूपलम, लिसा रे, सपना पब्बी, अमृता पुरी आणि मिलिंद सोमन हे या वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. ही वेब सिरीज अॅमेझॉन प्राईमवर 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.