साथीदाराच्या हत्येनंतर तृतियपंथीयांचा रुग्णालयात धुडघूस

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्हा रुग्णालयात तृतियपंथीयांच्या टोळक्याने धुडगुस घातला आहे. मेरठमधील माजी सपा नेते हाजी फाको यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली. हाजी फाको यांच्यावर मंगळवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हाजी फाको सूट आणि साड्यांचा व्यवसाय करायचे. तृतियपंथीय लोकांशी संबंध असणाऱ्या फाको यांच्या हत्येनंतर शहरातील तृतियपंथीयांनी एकत्र येत रुग्णालयात धुसून धुडघूस घातला. पोलिसांनी तृतियपंथीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनाही न जुमानता तृतियपंथीयांनी घोषणाबाजी करत फाको यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.


तृतियपंथीयांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर आरोप केला आहे की, डॉक्टरांनी फाको यांच्या शरीरातील गोळी न काढल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना विचारले असता, पोलिसांनी काही लोकांकडून याचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचे सांगितले. तसेच तृतियपंथीयांचा फाको यांच्या शरीरातील गोळी न काढल्याचा आरोप निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.