म्हणून विदेशात जाणारे १० पैकी ३ मुस्लिम ‘तीन तलाक’ देतात

सामना ऑनलाईन । मुंबई

तीन तलाकवर बंदी आणणारं विधेयक राज्यसभेकडून हिरवा कंदिल मिळणवण्यासाठी अडकलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तीन तलाकची प्रकरण सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. कामाच्या संदर्भात देशाबाहेर गेलेल्या १० पैकी ३ व्यक्ती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडल्यानं आपल्या पत्नीला तीन तलाक देत असल्याची माहिती समोर आली आहे.

तलाक संदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या आकड्यानुसार परदेशी गेलेले १० पैकी ३ स्त्रियांचे नवरे त्यांना लेटर लिहून किंवा सोशल मीडियाद्वारे तलाक देतात. सवत आणण्याच्या नादात आपल्या बायकोसोबत तलाक घेण्याच्या चुकीच्या गोष्टींना लोक अजूनही प्राधान्य देत आहेत.

मध्यंतरी भिवंडीमध्ये असा एक तलाकचा प्रकार दिसून आला. एका महिलेचा नवरा कामाकाजासंदर्भात दुसऱ्या राज्यात आहे आणि त्या व्यक्तिने आपल्या बायकोला पत्र लिहून तलाक दिला आहे. ‘तीन तलाक’ च्या विरोधात लढणारी संस्था हिंदुस्थानी मुस्लिम महिला आंदोलन आणि पब्लिक कंप्लेट सेंटरच्या मते १० पैकी ३ स्त्रियांचे पती दुसऱ्या स्त्रिच्या प्रेमात पडतात आणि आपल्या पहिल्या पत्नीला तलाक देऊन त्यांना मानसिक शॉक देतात. हिंदुस्थानी मुस्लिम महिला आंदोलन संस्थाच्या नुसार गेल्यावर्षी त्यांच्याकडे ‘तीन तलाक’ यावर १७५ पेक्षा जास्त प्रकरणं आली आहेत. यामध्ये ३० गुन्हे असे आहेत की, पती परदेशात राहत असून लेटर, व्हॉट्सअॅप च्या साहाय्याने त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला तलाक दिला आहे.

पब्लिक सेंटरचे अब्दुल रझ्झाक मणियार पण मान्य करतात की, प्रत्येकवेळी ह्या स्त्रियांचे पती रोजगारासाठी परदेशात किंवा इतर राज्यात जातात, दुसऱ्या स्त्रियांच्या प्रेमात पडून आपल्या पत्नीला सोडून देतात. त्यांच्या संस्थेत दरवर्षी २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात.