Video : काँग्रेस नेत्याने पोलीस स्थानकात आरोपीला कानफटवले

3

सामना ऑनलाईन । खोवाई

त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष प्रद्योत किशोर देब बर्मन यांनी चक्क पोलीस स्थानकात एका आरोपीला कानफटवले आहे. त्यांची ही दादागिरी पोलीस स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून आता तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रद्युत यांची मोठी बहिण प्रज्ञा देब बर्मन यांना काँग्रेसकडून पूर्व त्रिपुरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. गुरुवारी त्या प्रचार करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यात सुदैवाने प्रज्ञा यांना दुखापत झाली नाही. त्यानंतर त्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली व त्याला पोलीस स्थानकात आणले. तिथे तो आरोपी बसलेला असताना प्रद्योत तिथे आले व त्यांनी आरोपीला कानाखाली लगावली. पोलिसांनी त्यावेळी मध्यस्थी केली म्हणून प्रद्योत थांबले.