Video: आश्चर्य! मान नसतानाही कोंबडी आहे जिवंत

सामना ऑनलाईन । बँकॉक

कोंबडीची मान कापली तर ती किती दिवस जिवंत राहील? फार फार तर काही मिनिटं… पण अशी कोंबडी आहे जी मान कापल्याच्या आठ दिवसांनंतरही जिवंत आहे. या कोंबडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थायलंडमधील राचाबुरी प्रांतांतील मियुआंग येथील ही कोंबडी असल्याचं समोर येत आहे. सध्या ही कोंबडी बौद्ध भिक्षूंकडे आहे.

डॉक्टर इंजेक्शनच्या सीरिंजच्या साहाय्याने कोंबडीला खायला देत आहेत. तसेच अँटिबायोटिक्स औषधेही या कोंबडीला देण्यात आली आहेत. मान नसूनही ही कोंबडी सगळीकडे फिरत आहे. हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. कोंबडीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही या कोंबडीच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. ‘ही कोंबडी लढवय्यी असून तिला जगण्याची इच्छा आहे’ अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

कोबडींची मान नेमकी कशी कापली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. कोंबडीवर एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला असावा, त्या हल्ल्यात कोंबडी जखमी झाली असावी, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.