युध्द होणार ? ट्रम्पने उत्तर कोरियाकडे रवाना केली जगातील तीन महाकाय लढाऊ विमाने

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यात जुंपली आहे. यापार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या दिशेने जगातील सर्वात महाकाय अशी तीन लढाऊ विमाने रवाना केली आहेत. यास अमेरिकेच्या नौदलाने दुजोरा दिला आहे.

ही विमाने प्रशांत महासागराच्या पश्चिम क्षेत्रात संयुक्त युध्द अभ्यास करणार आहेत. २००७ नंतर पहिल्यांदाच अमेरिका मॉकड्रिलसाठी या विमानांचा वापर करत आहे. २००७ नंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे नौदल, हवाईदल व लष्कर संयुक्तरित्या मोठा युद्ध अभ्यास करणार आहे, अशी माहिती अमेरिकेच्या एका ज्येष्ठ नौदल अधिकाऱ्याने दिली आहे.