माझा बॉम्ब तुझ्यापेक्षाही मोठा आहे, ट्रम्प यांचे किम जाँगला उत्तर

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याने माझ्या टेबलावर अणुबॉम्बचं बटन असल्याची अमेरिकेला धमकी दिली होती. याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर देताना म्हटलंय की “माझ्याकडेही अण्वस्त्राचं बटन असून हे अण्वस्त्र तुझ्याकडे असलेल्या बॉम्बपेक्षा मोठं आणि शक्तीशाली आहे, माझ्याकडे असलेलं बटन व्यवस्थित काम करतं”

किम जाँग उनने नवीन वर्षाच्या संदेशात अमेरिकेला धमकी देताना म्हटलं होती की आता अमेरिका उत्तर कोरियावर हल्ला करू शकणार नाही कारण संपूर्ण अमेरिका ही आपल्या अण्वस्त्र हल्ल्याच्या टप्प्यात आहे. अमेरिकेच्या कोणत्याही भागावर हल्ला करण्याची उत्तर कोरियाची ताकद असल्याची धमकी किमने दिली होती. याला ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय.