वेडीवाकडी तोंडे करणाऱ्याला ट्रम्प यांच्या सभेतून हाकलून दिले

सामना ऑनलाईन, मोन्टाना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोन्टाना इथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये वेडीवाकडी तोंडं केल्याने एका तरुणाला हाकलून देण्यात आलं आहे. हा तरुण ट्रम्प यांच्या बरोबर मागे उभा होता, ज्यामुळे तो ट्रम्प बोलत असताना अगदी व्यवस्थित दिसत होता. ट्रम्प जे मुद्दे मांडत होते ते पटले नाही की हा तरूण तोंड वाकडं करायला, हसायला सुरुवात करत होता. त्याचे हे हावभाव बघितल्यानंतर ट्रम्प यांची तो भंकस करत असल्याचं सहजपणे दिसत होतं. हे पाहिल्यानंतर त्याला ताबडतोब सभेच्या ठिकाणाहून हाकलून देण्यात आलं. या घटनेचा हा व्हिडीओ पाहा