…म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षांचे ट्विटर हँडल बंद पडले

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

ट्विटर कंपनीतील एका कर्मचाऱ्याने कंपनी सोडताना अखेरच्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर हँडल डिअॅक्टिव्ह केले. हा प्रकार लक्षात येताच ट्विटरकडून हँडल पुन्हा अॅक्टिव्ह करण्यात आले तसेच ट्रम्प यांची माफी मागण्यात आली. मात्र कर्मचाऱ्याच्या उद्योगामुळे तब्बल ११ मिनिटांसाठी ट्रम्प यांचे ट्विटर हँडल बंद पडले होते.

गुरुवारी संध्याकाळी ट्रम्प यांचे ट्विटर हँडल अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. अमेरिकेसारख्या महासत्तेचे नेतृत्त्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर हँडल बंद करण्याचे धाडस कोणी करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे हँडल हँक झाले की काय?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र ट्विटरला आपल्या कर्मचाऱ्याचा उद्योग कळला. ट्रम्पविरोधी गटात असल्याने आपण ट्रम्प यांचे हँडल बंद पाडल्याची कबुली संबंधित कर्मचाऱ्याने दिली. ट्विटर कस्टमर सपोर्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कबुली देताच ट्रम्प यांचे हँडल पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ ट्रम्प ट्विटर विश्वातून बाहेर फेकले गेल्याच्या चर्चेला उधाण आले,