जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाला!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विश्वासार्हतेत घसरण होत आहे. जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाला असल्याचे ‘ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स’ रॅकिंगवरून स्पष्ट झाले आहे. या रॅकिंगमध्ये गेल्यावर्षी हिंदुस्थान पहिल्या स्थानी होते. २०१८ मध्ये तिसऱया क्रमांकावर घसरण झाली आहे. चीन मात्र पहिल्या स्थानावर आहे.

कम्युनिकेशन मार्केटिंग फर्म ‘इडलमॅन’ या जागतिक संस्थेकडून दरवर्षी ‘ट्रस्ट इंडेक्स’ जारी केला जातो. देशातील जनता, व्यापारी, एनजीओ, मिडिया या वेगवेगळ्या घटकांना सरकारबद्दल किती विश्वास आहे, हे जाणून घेतले जाते. १०० गुणांपैकी रँकिंग काढले जाते.

कोणाला किती रँकिंग

२०१७ मध्ये हिंदुस्थान ७२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षी ४ गुणांची घसरण होऊन तिसऱया स्थानावर रँकिंग घसरले आहे. मोदी सरकारवर जनतेचा विश्वास कमी होत असल्याचेच यावरून स्पष्ट होते. २०१७ मध्ये चीन ६७ गुणांसह तिसऱया क्रमांकावर होते. यावर्षी ७ गुणांची कमाई करीत चीनने पहिले स्थान पटकावले आहे.