विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग व्हायरल

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ मधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. भोर येथे लग्न आणि इतर समारंभांचं शूटिंग पार पडलं. सुबोध भावे, इशा म्हणजेच गायत्री, झेंडे, मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे, विक्रांतचा भाऊ जयदीप आणि सोनिया वहिनी यांनी एकत्र मिळून एक रॅप साँग बनवलंय. हे रॅप सॉंग या सर्व कलाकारांनी मिळून बनवलं आहे आणि ते चालबध्द देखील केलंय.

या रॅप सॉंगचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आणि  सध्या ते खूप व्हायरल होतंय. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करणारे कलाकार त्यांच्या सोशल मीडियाद्वारे देखील चाहत्यांसोबत संपर्कात राहतात आणि त्यांचं मनोरंजन करतात.