मीडिया आता मला तो प्रश्न विचारत नाही

सामना ऑनलाईन । मुंबई

विद्या बालनचा अंदाज पुन्हा एकदा दिसला. मीडियाच्या कुठल्याही गुगलीला खास स्टाइलमध्ये उत्तर देणाऱया विद्या बालनने मीडियाला एका प्रश्नाची आठवण करून दिली. मीडिया आता आपल्याला आई केव्हा होणार हा प्रश्न विचारत नाही असे विद्या म्हणाली. ‘तुम्हारी सुलू’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने विद्या बालनने मीडियाशी संवाद साधला. लग्नानंतर मीडिया माझ्या आई बनण्याबाबत सातत्याने प्रश्न विचारत असे. पण,आता हा प्रश्नच जणू गायब झाला आहे. कदाचित मीडियासाठी हा प्रश्नच आता आऊटडेटेड झाला आहे असे विद्या म्हणाली. विद्या बालनचे लग्न २०१२ मध्ये निर्माता सिध्दार्थ रॉय कपूरशी झाले होते.