कासव

कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागते.

परीक्षेत यश मिळण्यासाठी

विद्यार्थ्यांबरोबरच मोठी माणसेही नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी परीक्षा देतात. परीक्षेत यश मिळण्यासाठी पितळेचे कासव घरात ठेवावा.

धनप्राप्तीसाठी

कासव हे धनाचे प्रतीक मानले जाते. घरात पैंशाची चणचण असेल अशांनी  क्रिस्टलचे कासव घरात ठेवावा. हे कासव कामाच्या ठिकाणी किंवा तिजोरीतही ठेवता येते.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी

तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चांदीचे कासव ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने कुणाची नजर लागत नाही.

व्यवसायात यश मिळण्यासाठी

सततचे व्यवसायात होणारे नुकसान थांबवायचे असेल आणि यश मिळवायचे असेल तर धातूचे कासव ठेवायला हवा. हे कासव बेडरूममध्ये दुकान आणि ऑफिसमध्ये ठेवावे.

आजारांपासून वाचण्यासाठी

वारंवार घरात जर कोणी आजारी पडत असेल तर मातीपासून बनवलेले कासव घरात ठेवावे.

अपत्य प्राप्तीसाठी

ज्या कासवाच्या पाठीवर कासवाची पिल्ले आहेत, त्याला संतान होण्यासाठी शुभ मानले जाते. जे दांपत्य संतान सुखापासून वंचित आहेत आणिज्यांना मूल हवे आहे, अशांनी अशाप्रकारचे पितळेचा कासव घरात ठेवावे.