पटोले, तुम्ही लढा, माझा तुम्हाला आशीर्वाद!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात चुरशीची लढत...

सामना प्रतिनिधी । नागपूर

‘नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. माझा आशीर्वाद त्यांना आहे. अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या पटोले यांना दिल्या.

नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे घनिष्ठ सहकारी होते. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.