बलात्काराप्रकरणी ‘या’ अभिनेत्याला झाली अटक

1

सामना ऑनलाईन । मुंबई

‘देवो के देव.. महादेव’ या पौराणिक मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अभिनेता पियुष सहदेवला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका २३ वर्षीय फॅशन डिझायनरने त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मॉडेलिंग आणि अॅक्टींग करियरमध्ये मदत करेन असं सांगून बलात्कार केल्याचा तरुणीने आरोप केला आहे. तरुणीने २० नोव्हेंबरला पियुष विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पियुष सहदेवला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ‘देवों के देव…महादेव’, ‘सपने सुहाने लड़कपन के’ आणि ‘बेहद’ या मालिकांमध्ये पियुषने काम केलं आहे. तसेच घर एक सपना’, ‘गीत’, ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ आणि ‘हम ने ली है शपथ’ मालिकांमध्ये ही त्याने काम केले आहे.