एका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन

सामना ऑनलाईन । मुंबई

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘कबूल है’मधील अभिनेत्री चाहत खन्ना हिच्या आईचे निधन झाले आहे. लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतानाच ही दु:खद घटना झाल्याने एका क्षणात सर्व आनंदाचे वातावरण दुखात बदलले. चाहतने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहून आईच्या निधनाची माहिती दिली.

चाहतने इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, ‘हे सर्व एका क्षणात झाले. आम्हाला असे काही होईल वाटलेही नव्हते. माझी आई भावाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला गेली होती. तिथे तिला मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला आणि तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचे म्हटले.’

तसेच आईच्या अंतिम क्षणी तिच्या जवळ नसल्याचे चाहतने दु:ख व्यक्त केले. मी त्यावेळी दादा साहेब फाळके अवॉर्डचे प्रमाणपत्र घेत होते आणि आता एका तासाने मी आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आल्याचे चाहत भरल्या डोळ्याने म्हणाली.

चाहतने गेल्या वर्षी पती फरहान मिर्झापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. घरगुती हिंसाचाराचा आरोप लगावत तिने घटस्फोट घेतला होता. ‘कबूल है’ या मालिकेसह ‘बडे अच्छे लगते है’ यातही तिची भूमिका होती. आईच्या मृत्यूनंतर चाहतने एक भावूक पोस्ट लिहून आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.


View this post on Instagram

This is her last memory with me, just two days back .. and 2 days later I’ll do her chautha.. maa ull be missed n how ..

A post shared by Chahatt Khanna (@chahattkhanna) on