हिंदुस्थानात लाँच झाले ट्विटरचे नवे ‘मोमेंट’ फिचर

सामना ऑनलाईन । मुंबई

ट्विटरने हिंदुस्थानात एक नवे फिचर लॉंच केले आहे. इन्टाग्राम आणि स्नॅपचॅट स्टोरीज प्रमाणे हे ‘मोमेंट’ फिचर असणार आहे. ‘मोमेंट’ फिचरच्या साहाय्याने ट्विटर युजरला ट्विटरवरील सर्वात चांगली बातमी, स्टोरी, ब्रेकिंग न्यूज पाहता येणार आहे. ट्विटरने हे फिचर आधी काही ठराविक लोकांसाठीच सुरू केलं होतं, परंतु आता हे फिचर आता सर्व युजर्स वापरू शकतात. हे फिचर एका वेगळ्या टॅबमध्ये देण्यात आले असून, संबंधित बातमी, ब्रेकिंग न्यूज या फिचरच्या माध्यमातून पाहिल्या जाऊ शकतात.

तुम्ही कोणाला फॉलो करत नसाल तरीही एखादी महत्त्वाची बातमी, ट्रेंडिंग स्टोरी ‘मोमेंट’ फिचरवर क्लिक करुन पाहू शकता. या ‘मोमेंट’ फिचरच्या एका क्लिकवर ट्विटरवर असणारी सर्वात महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहचू शकते. ट्विटरवर युजर्स गेल्या काही दिवसांतील मनोरंजन, स्पोर्टस् सारख्या सतत येणाऱ्या स्टोरीज् पाहण्यासाठी ‘स्वाइप’ करु शकता. त्या ट्विटवर एकदा क्लिक केल्यावर संपूर्ण स्टोरी वाचता येऊ शकते, या स्टोरीला फेव्हरेट ट्विट तसेच रिट्विटही करु शकता.

‘मोमेंट’ फिचरच्या उजव्या बाजूला एक निळ्या रंगाचा पॉइंट दाखवण्यात आला आहे. हा पॉइंट म्हणजे आधी पाहिल्या गेलेल्या स्टोरीमध्ये आणखी काही गोष्टी जोडल्या गेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. ट्विटर किंवा ट्विटर लाइट वरुनही ट्रेंडिंग स्टोरीज् पाहता येऊ शकतात. ट्विटर लाइटच्या एक्सप्लोअर टॅबवर क्लिक करुन रोज पब्लिश होण्याऱ्या स्टोरीज् यूजर्स पाहू शकतात.