… तर ट्विटरवर तुम्ही ब्लॉक व्हाल

twitter

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ट्विटरचा वापर यापुढे अधिक सावधगिरीने करावा लागणार आहे. अनेकदा युजर्सकडून ट्विट करताना अभद्र भाषेचा वापर केला जातो. विशेषत: एखाद्याला ट्रोलिंग करताना किंवा एखाद्यावर राग व्यक्त करताना मर्यादा ओलांडली जाते. यावर आता चाप बसणार असून लाईक्ह स्ट्रिमिंग दरम्यान चुकीची भाषा कापरणाऱयांना ब्लॉक करण्यात येणार आहे. येत्या १० ऑगस्टपासून हा नका नियम लागू करण्यात येणार आहे.

ट्विटर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ब्लॉक अकाऊंटचा रिह्यू घेऊन नियमांचे उल्लंघन होतंय का, हे तपासून बघितले जाणार आहे. अभद्र भाषा कापरणाऱया अकाऊंटची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. कोणीही आपल्या अकाऊंटकरून लाईक्ह करत असेल आणि त्याकेळी त्या क्यक्तीला फॉलो करणाऱया किंवा न करणाऱया व्यक्तीकडून आक्षेपार्ह कमेंटस् आल्या की जास्त लक्ष ठेवले जाईल. त्या कमेंटवर आपला रिव्ह्यू देऊन त्यानंतर ती कमेंट ठेवायची की युजरला ब्लॉक करायचे हे संबंधित यंत्रणेकडून ठरविण्यात येईल. त्यामुळे ट्विटर अकाऊंट अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास आहे.