पैज जिंकल्याने टेनिसस्टार झाली त्याची एक दिवसाची प्रेयसी

सामना ऑनलाईन,न्यूयॉर्क

पैज जिंकल्याने कोणी लखपती होतो, कोणी करोडपती होतो असं आपण ऐकलं आहे. मात्र अमेरिकेमध्ये पैज जिंकल्याने एका फॅनच्या आयुष्यात एका दिवसासाठी सुंदर टेनिसपटू प्रेयसी बनून आली. ती रात्र अर्थातच त्याच्यासाठी अविस्मरणीय बनली होती

genie-bouchard-1

यामागची कहाणी अशी आहे

एका रग्बीच्या मॅचमध्ये अटलांटा फॉल्कन आणि इंग्लंड पॅट्रीअट या दोन संघात मुकाबला होता. अटलांटा फाल्कनचा संघ सामन्यात २१-० ने पुढे होता यावेळी टेनिस स्टार युजिनी बुशार्डने ट्वीटरवर ठामपणे सांगितलं की अटलांटाचाच संघ सामना जिंकेल. मात्र या ट्वीटरला उत्तर देताना जॉन जोहर्केने म्हटलं की असं होणार नाही आणि इंग्लंड पॅट्रीअटचाच संघ जिंकेल आणि असं झालं तर तू माझ्यासोबत एक दिवसासाठी डेटवर येशील. यानंतर सामन्यात चमत्कार झाला आणि पॅट्रीअटचाच संघ सामना जिंकला.

genie-bouchard

सामना संपला आणि जॉन पैज जिंकला होता, त्यामुळे युजिनीने पैज पूर्ण करण्यासाठी त्याच्यासोबत डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. डेटवर असतानाचे फोटो तिने ट्वीट देखील केले आहेत.