एअर शो सरावादरम्यान दोन विमानांची धडक, एका पायलटचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बेंगळुरू येथे सुरू असलेल्या एअर शो सरावादरम्यान भीषण दुर्घटना झाली आहे. वेलाहंका एअर बेसवर शोपूर्वी सराव सुरू असताना दोन सूर्यकिरण विमानांची धडक झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून घटनास्थळावर धुरांचे लोट पाहायला मिळत आहे. या अपघातामध्ये एका पायलटचा मृत्यू झाला आहे, तर एक जखमी आहे.

मंगळवारी बेंगळुरुच्या वेलाहंका एअर बेसवर शोपूर्वी सराव सुरू होता. या सरावामध्ये सूर्यकिरण विमानांनी सहभाग घेतला होता. सरावादरम्यान दोन विमानांची धडक झाली. दोन्ही विमानांचे पायलट पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरले परंतु एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान बेंगळुरूच्या येलहंका येथे ‘एअर इंडिया 2019’ चा दुसरा एअर शो होणार आहे. या पाचदिवसीय कार्यक्रमापूर्वी विमानांचा सराव सुरू होता. याच दरम्यान हा अपघात झाला.

आयएएफने या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, मंगळवारी दुपारी 11 वाजून मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या अपघातात एक नागरिक जखमी झाल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे.