कॉसमॉस बँक दरोडा; भिवंडी, संभाजीनगरमधून दोघे अटकेत

सामना ऑनलाईन । पुणे

कॉसमॉस बँकेवरील दरोडय़ा प्रकरणी पोलिसांनी भिवंडी, संभाजीनगर येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएम केंद्रांतून 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. न्यायालयाने दोघांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. फहीम मेहफूज शेख (27, रा. नुरानी कॉम्प्लेक्स, भिकंडी), फहीम अझीम खान (30, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.