चंद्रपूर- 9 लाखांच्या दारूची तस्करी; पोलीस कर्मचारी, सरकारी अधिकाऱ्याचा नातेवाईक अटकेत

67

सामना प्रतिनिधी, चंद्रपूर

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारु तस्करीचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. वरोरा पोलिसांनी दारू तस्करीच्या आरोपाखाली आज सकाळी 2 जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये सचिन हांडे आणि प्रणव म्हैसेकर यांचा समावेश आहे.

धक्कादायक म्हणजे सचिन हांडे हा नागपूर पोलीस दलात सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई आहे. तर प्रणव म्हैसकर हा एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा नातेवाईक आहे. वरोरा पोलिसांना खबरीच्या माध्यमातून नागपुरातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका गाडीत दारूसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी नंदोरी टोलनाक्यावर एस क्रॉस गाडी क्रमांक MH31 EU 4873 थांबविण्यात आली आणि तिची झडती घेण्यात आली. या गाडीत 8 पेट्या विदेशी दारू सापडली असून जप्त केलेल्या दारू आणि गाडीची किंमत अंदाजे नऊ लाख 35 हजार सांगण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या