आंध्र प्रदेशमधील बहिण भावांचे अपहरण; तक्रार दाखल

47

सामना प्रतिनिधी । चाकूर

तालुक्यातील आष्टामोड येथे वास्तव्य करीत असलेल्या आंध्रप्रदेशमधील बहिणभावाचे अपहरण झाले असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशमधील पुलवेंदुला जि. कडप्पा येथील मल्लीकार्जुन दस्तगीर बालस्ता हे आष्टामोड येथे साडी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत त्यांच्या भावाचा मुलगा विजय बालस्ता (वय 12) व मुलगी रामाजी बालस्ता (वय 8) राहत होते. शुक्रवारी मुले घरासमोर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना पळवून घेऊन नेल्याची फिर्यादी दिल्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गित्ते करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या