मांजरींच्या नावावर दोन कोटींची संपत्ती

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन | न्यूयॉर्क

न्यूयॉर्कमध्ये  दोन मांजरींची संपत्ती ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. टायगर आणि ट्रॉय नावाच्या या मांजरींच्या नावावर तब्बल दोन कोटी रुपये आहेत. एवढी संपत्ती आली कुठून, हा प्रश्न पडला असेल ना…झालं असं की एलन ही महिला मांजरींना कुटुंबातील एक सदस्य मानत होती. एलन यांच्या मुलांचा आणि पतीचा मृत्यू झाल्यानंतर केवळ या मांजरीच त्यांच्या कुटुंबात उरल्या. मांजरींचा त्यांना आधार होता. टायगर आणि ट्रॉय या दोघींमध्ये एलन मन रमवू लागल्या.

एलन या चांगल्याच श्रीमंत आहेत. तब्बल १९ कोटींची त्यांची मालमत्ता आहे. त्यापैकी दोन कोटी त्यांनी मांजरींच्या नावावर लिहून ठेवले. आपल्या पश्चात टायगर आणि ट्रॉय या दोघींची आबाळ होऊ नये यासाठी एलन यांनी हा निर्णय घेतला.