सिकेरीमध्ये २ मृतदेह सापडले, अकोल्याचे बेपत्ता पर्यटक असण्याची शक्यता

फोटो प्रातिनिधीक

देवेंद्र वालावलकर, पणजी

गोव्यातील सिकेरीच्या समुद्र किनाऱ्यावर दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह ११ जून रोजी कळगुंटच्या समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचे असण्याची दाट शक्यता आहे. हे त्यांचे मृतदेह आहेत का हे जाणून घेण्यासाठी बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबीयांना गोवा पोलिसांनी बोलावून घेतलं आहे.

अकोल्याजवळच्या मोठी उंबरी इथले १४ पर्यटक सोमवारी म्हणजेच ११ जून रोजी पहाटे ४ च्या सुमारास मडगांव स्थानकात उतरले होते. इतून ते थेट कळंगुटच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. समुद्र बघून बेभान झालेले हे सगळे जण समुद्रात उतरले होते. यातील ५ जणांना लाटेने खेचून घेतलं. पोहता येत नसल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने यातील ३ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. किरण म्हस्के आणि शुभम वैद्य तेव्हापासून बेपत्ता झाले असून त्यांचा शोध लागू शकलेला नाहीये.