Accident भरधाव ट्रकची रिक्षाला भीषण धडक, चालकासह प्रवासी जागीच ठार

206

सामना प्रतिनिधी । मलकापूर (जि.बुलढाणा)

मुक्ताईनगर तालुक्यातील ग्राम चिखली (घोडसगांव) नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज दुपारी चार वाजेदरम्यान भरधाव ट्रकने रिक्षाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालकासह प्रवासी महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली.

मलकापुर तालुक्यातील दसरखेड येथील विनोद कुंदनलाल जैस्वाल हे त्यांची ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच. 28 टी 3602 ने प्रवासी घेऊन मुक्ताईनगर कडून दसरखेडला येत होते. याचवेळी मलकापूर कडून जळगाव (खा) कडे जाणार्‍या ट्रक क्रमांक एम.पी. 14 एलबी 2277 च्या चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षाला जबर धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक विनोद जैस्वाल (50, रा.दसरखेड) व प्रवासी रेखाबाई पाचपोळ रा.वाघोळा हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताबरोबर शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या