मालदीवमध्ये परिस्थिती चिघळली; दोन हिंदुस्थानी पत्रकारांना अटक

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । माले

मालदीवमध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. शुक्रवारी मालदीवच्या एकूण परिस्थितीचं वार्तांकन करणाऱ्या दोन हिंदुस्थानी वंशाच्या पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही पत्रकारा हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटीश नागरीक आहेत. मनी शर्मा आणि आतिश रावजी पटेल अशी दोन पत्रकारांची नावं आहेत. या दोन्ही पत्रकारांना मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

दोन्ही पत्रकारांच्या अटकेनंतर प्रतिक्रिया देतांना मालदिवचे खासदार अली जाहिर यांनी म्हटलं की, मालदीवमध्ये माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. गुरुवारी रात्री एक टीव्ही वाहिनी बंद करण्यात आली आहे. आम्ही या पत्रकारांच्या तात्काळ सुटकेची तसेच देशात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेची मागणी करतो. मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन यांनी १५ दिवसांसाठी आणीबाणी लागू केली आहे.

मालदीवच्या सुप्रीम कोर्टानं माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीच्या यांच्यासह ९ जणांच्या विरोधातील याचिका रद्द करत या सर्व राजकीय नेत्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश न जुमानता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला विरोध करत आणीबाणी लागू केली. यामिन यांनी त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. याआधी २०१५ स्वत:च्या जीवाला धोका असल्याचं कारण देत यामिन यांनी मालदीवमध्ये आणीबाणी लागू केली होती