रोहिंग्याचे रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांना 7 वर्षांची शिक्षा


सामना ऑनलाईन ।  नवी दिल्ली

रोहिंग्यांच्या वार्तांकनप्रकरणी रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांना म्यानमारमधील न्यायालयाने प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. वा लोन आणि क्यूब सो ओ अशी दोघांची नावे आहेत. वार्तांकन करताना सरकारी गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. या निर्णय म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका होत आहे. म्यानमारमधील रोहिंग्या शरणार्थींवर होत असलेल्या हिंसेचे वार्तांकन  केल्यामुळे रॉयटर्सचे दोन पत्रकार डिसेंबरपासून तुरुंगात आहेत.