कॉलेजमध्ये लावले कश्मीरच्या आझादीचे पोस्टर्स, दोन विद्यार्थ्यांना अटक

सामना ऑनलाईन । कोची

करेळमधील मल्लपुरम सरकारी महाविद्यालयात दोन तरुणांनी कश्मीरच्या आझादीचे पोस्टर लावल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद रिनशाद आणि मोहम्मद फरिस या दोन विद्यार्थ्यांना अटक केली असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात त्यांची चौकशी सुरू असून त्यांनी असे का केले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.