चोरीचा आरोप करत अल्पवयीनांवर एकमेकांशी संभोगाची जबरदस्ती

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

घरामध्ये चोरी केली या संशयावरून कंवर सिंह नावाच्या एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलांना घरी बोलावलं. त्यांनी चोरीचा आरोप अमान्य केल्यानं कंवरने त्याच्या ९ मित्रांना घरी बोलावत या लहानग्यांना नग्न केलं. यानंतर त्यांनी चामड्याच्या पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी या अल्पवयीनांना बेदम मारहाण केली. तरीही दोघे आरोप मान्य करत नसल्याने संतापलेल्या कंवर सिंह यांनी या दोघांना एकमेकांसोत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडलं.

२६ ऑक्टोबरला घडलेल्या या प्रकाराचं मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अल्पवयीनांच्या कुटुंबियांना याबाबत कळालं, त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली, या तक्रारीच्या आधारे १० जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका मुलाचं वय १३ वर्ष आहे तर दुसऱ्या मुलाचं नाव १५ वर्ष आहे. या दोघांच्या गुप्तांगांना सिगारेटचे चटकेही देण्यात आले असल्याचं तपासात उघड झालं आहे.