खडका शिवारात दोघांची निर्घृण हत्या

1

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम खडका शिवारात दोन पुरुषांचे मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. नायलॉन दोरीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला आणि मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून डोक्यात, चेहर्‍यावर दगडांचे घावही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमधील एक व्यक्ती 50 ते 55 वर्ष वयोगटातील तर दुसरी 35 ते 40 वर्ष वयोगटातील असून दोघेही रायपूर परिक्षेत्रातील असल्याची माहिती मिळत आहे. एकाच्या हातावर मधुकर घोलप असे लिहिलेले असून बजरंग बलीचे चित्र गोंदलेले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार कारेगावकर आपल्या पथकासह घटनास्थळावर पोहोचले आहे. यातील एकाच्या अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व त्याच रंगाची पँट, मध्यम बांधा व सावळा वर्ण आहे तर दुसरा मृतदेहाच्या अंगावर पांढर्‍या रंगाचा शर्ट व करड्या रंगाची अंडरवेअर आहे.