सीएसएमटी पूल दुर्घटनेत जीटी रुग्णालयातील दोन परिचारिकांचा मृत्यू

15


सामना ऑनलाईन । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला असून त्यात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सीएसएमटी स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या जीटी रुग्णालयातील दोन परिचारिकाचा देखील मृत्यू झाला आहे. अपूर्वा प्रभू(35) आणि रंजना तांबे (40) अशी त्या दोघींची नावे असून त्या रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

या दुर्घटनेत 34 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या