दोन मोरांचा तडफडून मृत्यू

1

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात दोन दिवसात दोन मोरांचा तडफडून मुत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वडीगोद्री परिसरात धाकलगाव शिवारात सकाळी ११ फेब्रुवारी रोजी एका मोराचा अचानक तडफडून मृत्यू झाला असतांनाच आज १२ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा तेथेच काही अंतरावर कृषी खात्याच्या जमिनीवर दुसरा मोर मेल्याचे दिसून आले.

वनविभागाचे कर्मचारी व्ही. एन. म्हस्के यांनी त्वरीत घटनास्थळी भेट देऊन मयत झालेल्या दोन्ही मोरांना अंबड येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. हे मोर विषबाधेमुळे की, अन्य कारणाने मयत झाले, हे
शवविच्छेदनानंतर समजू शकेल, असे वनविभागाचे अधिकारी अप्पासाहेब तांगड यांनी सांगितले.