कश्मीरात दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

1

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यात न्यायालयाच्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून दहा जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पुलवामात न्यायालयाच्या परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले. घटनेनंतर परिसरात सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी अनंतनागच्या जंगलात गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड फेकले. त्यात १० जवान जखमी झाले आहेत. रमजानच्या शेवटच्या पाच दिवसांत मोठे हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुलवामातील कानजीगंज येथे दहशतवाद्यांनी पेरलेले आयईडी स्फोटके सुरक्षा दलाने निकामी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.