नगर: जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले, ३ ठार

सामना ऑनलाईन । नगर

नगर जिल्ह्यातील निंबोडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळून २०-२५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले आहेत. या दुर्घटनेत श्रेयस रहाणे आणि वैशाली पोटे यांच्यासह आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमी झालेल्यांना नगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीला धोका निर्माण झाला आणि पाचवीच्या वर्गाचे छत कोसळले. जखमी झालेल्यांना डोक्याला तसेच पायाला जास्त दुखापत झाली आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेत एक शिक्षकही जखमी झाले आहेत.