जम्मू कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

25

सामना ऑनलाईन । कुलगाम

जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. झीनत उल इस्लाम आणि शाकील अहमद दार अशी त्या दहशतवाद्यांची नावे असून ते दोघेही हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधित अल बद्र या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

कुलगाम जिल्ह्यातील काटापोरा व यारीपोरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर केंद्रीय राखील पोलीस दल, राज्य पोलीस व लष्कराने एकत्रितपणे या भागात शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या चकमकीत मारला गेलेला झीनत उल इस्लाम हा शोपियन जिल्ह्यातील रहिवासी असून तो 2015 मध्ये हिजबुलमध्ये सामील झाला होता. तर शाकील अहमद दार हा आयईडी बॉम्ब बनविण्यात मास्टर होता.

आपली प्रतिक्रिया द्या