लपून बसलेले दोन अतिरेकी लष्कराने असे टिपले

40
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या दक्षिणेकडील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी रात्री हिंदुस्थानी सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. अनंतनाग येथे दहशतवादी आणि हिंदुस्थानी सैन्यात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. हे दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे होते. त्यांच्याकडून एके-४७सह अन्य काही वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अनंतनाग येथील डोरू भागात शुक्रवारी रात्री उशिरा हिंदुस्थानी सैन्याला हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, १९ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी डोरूमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं. या सर्च ऑपरेशन दरम्यान एका घरातून दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ते दोन्ही दहशतवादी ठार झाले.

अनंतनाग परिसरात हिंदुस्थानी सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरू असून अजूनही काही दहशतवादी लपून बसले असावेत, असा सुरक्षादलांचा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या