दुचाकी-हरणाच्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

सामना प्रतिनिधी । गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मार्गावर दुचाकी आणि हरणाची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एका पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दमाहे आणि नंदु खरे हे दोघे दुचाकीने जात असताना अचानक एका मोठे हरीण गाडीवर येऊन आदळले. ही घडक एवढी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला १० ते १५ फुट घसरत गेली. यात दुचाकीवरील पोलीस हवालदार राजेंद्र दमाहे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदुर खरे हे गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये गंभीर मार लागलेल्या हरणाचाही मृत्यू झाला आहे.