हातकणंगले येथे भीषण अपघात, दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू

123

सामना प्रतिनिधी, हातकणंगले

पुण्याहून सिमेंट गोणी घेऊन येथील केएटीपी पार्क कडे निघालेला दहा चाकी ट्रक ( क्र. MH 12 HD 5297) व नवदांपत्याला जोतिबा दर्शनासाठी घेऊन निघालेली क्रूझर जीप ( KA 48 M 6829 ) यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी सकाळी सहा वाजता हातकणंगले वडगांव मार्गावर कुंभोज फाट्यानजीक घडला. वाहनांची धडक इतकी जोरदार होती की, ट्रक पलटी होऊन चाके निखळून पडली होती तर क्रूझरचा चक्काचूर झाला आहे.घटनांस्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. ट्रक रस्त्यातच मध्येच पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

शिवाली सिद्धाप्पा कुंभार (वय दोन वर्ष ) रा. सावळगी,ता. जमखंडी, जि. बागलकोट असे मृत बालिकेचे नाव आहे. तर. नीलिमा बसवराज कुंभार (25), बसवराज अशोक कुंभार (30), कावेरी सिद्दाप्पा कुंभार (25),राधिका भैराप्पा कुंभार (28), भैराप्पा कुंभार (32), रितेश सिद्वाप्पा कुंभार (9) निर्मला सुदेश कुंभार (34), प्रेमावली दुर्गाप्पा कुंभार (40) व हाजिसाब मुत्ला (57) सर्व रा. सावळगी,ता. जमखंडी हे नऊ जण गंभीर जखमी आहेत. अधिक माहिती अशी सावळगी येथील कुंभार कुटुंबीय क्रूझर जीपमधून नवदांपत्याला घेऊन जोतिबाला दर्शनांसाठी निघाले होते. पहाटे सहाचे सुमारास चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली.

आपली प्रतिक्रिया द्या