मुंबईत येणार उडणारी टॅक्सी

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

मुंबईच्या आकाशात जर विमानाबरोबरच टॅक्सी घिरट्या मारताना दिसली तर घाबरुन जाऊ नका. कारण उबेरने मुंबईसह दिल्ली व बंगळुरूमध्ये उडणारी टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही टॅक्सी विमानासारखीच असणार आहे.

पाच वेगवेगळ्या देशांमध्ये उडणारी टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय उबेरने घेतला आहे. यात हिंदुस्थानसह, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल आणि फ्रान्सचा समावेश आहे. ज्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक आहे तेथील नागरिकांसाठी ही उडणारी टॅक्सी सेवा देण्याचा उबेरचा उद्देश आहे. उबेरच्या उबेर एलिवेटने या उडणाऱ्या टॅक्सीची घोषणा केली आहे.
अमेरिकेतील डेलास आणि लॉस एंजेल्समध्ये सर्वात आधी ही उडणारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

summary-uber-launch-air-taxi-in-mumbai-delhi-and-bengaluru-soon