VIDEO: साताऱ्यात उदयनराजेंची डंपर सवारी

2

सामना ऑनलाईन । सातारा

आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिध्द असलेले साताऱ्याचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी चक्क डंपरने शहरातून रपेट मारली. नगरपालिकेच्या वतीने नव्याने खरेदी करण्यात आलेल्या वाहनांची पाहणी करण्यासाठी उदयनराजे आले होते. यावेळी अचानक त्यांनी डंपरची  स्टेअरिंग हातात घेतली आणि ट्रायल साठी शहरात फेरफटका मारला. त्यांच्या या कृतीने नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली.

उदयनराजेंची ही डंपर सफारी  बघण्यासाठी मोठ्या संखेने नागरीकांनी गर्दी केली होती. तर काही चाहत्यांनी  रस्त्यावर उभे राहून उदयनराजेंची डंपर सफारी मोबाईलमध्ये टिपली.