पंढरीतील शिवसैनिकांचा उत्साह शिगेला, 24 डिसेंबरच्या सभेची जय्यत तयारी

सुनील उंबरे । पंढरपूर

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये जाहीर सभा घेण्याचे जाहीर केल्यानंतर ही सभा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारलेला दिसत असून सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पंढरपूरमध्ये नियोजनाची बैठक पार पडली.

pandharpur-sena

पक्षप्रमुखांच्या या सभेला राज्यभरातून साधारणपणे लाखो शिवसैनिक उपस्थित राहतील असा अंदाज बांधून सभेचे ठिकाण, हेलिपॅड, पार्किंग, निवास व्यवस्था आदीबाबत चर्चा विनिमय होऊन घटनास्थळांची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी सुरेंद्र निगुडकर (उप विभाग प्रमूख मुंबादेवी), अभिजित गुरव (सह समन्वयक कुलाबा), शिवाजी रहाने (उप विभाग प्रमुख मलबार हिल,) किरण बाळसराफ (सह समन्वयक मलबार हिल), माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव लक्ष्मीकांत ठोगे पाटील (सहसंपर्क प्रमुख), संभाजी शिंदे (सोलापूर जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग), महावीर देशमुख (उपजिल्हाप्रमुख), संदीप केंदळे (पंढरपूर शहर प्रमुख) रवी मुळे (माजी शहरप्रमुख) सुधीर अभंगराव, सूर्यकांत घाडगे (उपजिल्हाप्रमुख), योगेश चव्हाण (युवा सेना), सिद्धेश्वर कोरे (उपजिल्हाप्रमुख ग्राहक संरक्षण), बाबा कोळी, काकासाहेब बुराडे, ओंकार बसवंती आदी उपस्थित होते.