बुकी संजीव चावलाच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन कोर्टाची मंजुरी


सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

क्रिकेट मॅच फिक्सिंग प्रकरणातील संशयित बुकी संजीव चावला याचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्यास ब्रिटनमधील न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली. दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत कर्णधार हॅन्सी क्रोनिए याच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या क्रिकेट मॅच फिक्सिंग करण्यात चावला याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

वेस्ट मिनिस्टर येथील दंडाधिकारी न्यायालयाने 50 वर्षीय संजीव चावला याच्यावरील प्रर्त्यापण कारवाईला मंजुरी दिली. आता हे प्रकरण औपचारिक मंजुरीसाठी गृहमंत्री साजीद जावीद यांच्याकडे पाठविले जाणार आहे.