निरव, मल्ल्या यांचे प्रत्यार्पण, बेकायदा स्थलांतरीत कराराशी जोडणार

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील सार्वजनिक बँकांना कोटय़वधींना बुडवून परदेशी पळालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी व मद्यसम्राट विजय मल्ल्या या दोघांना हिंदुस्थानात आणण्याचा प्रश्न दोन देशांतील बेकायदा स्थलांतरीत कराराशी जोडण्याचा ब्रिटन विचार करीत आहे. याबाबतचे संकेत ब्रिटनचे दहशतवादविरोधी मंत्री बॅरोनेस विल्यम्स यांनी हिंदुस्थानचे गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांच्याशी सोमवारी येथे झालेल्या बैठकीत दिले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून गेट ब्रिटनमध्ये तब्बल ७५ हजार हिंदुस्थानी स्थलांतरीत बेकादेशीरपणे राहात आहेत. दिल्लीतील बैठकीत विल्यम्स यांनी ब्रिटीश सरकारने ताब्यात घेतल्यावर एक महिन्याच्या आत हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरीतांना मायदेशी पाठविण्यासाठी दोन्ही देशात सामंजस्य करार व्हायला हवा, असे मत व्यक्त केले. यावेळी किरेन रिजीजू यांनी निरव मोदी आणि विजय मल्ल्या या कर्जबुडव्यांचा मुद्दा उपस्थित केला.

यापूर्वी १० जानेवारी रोजी किरेन रिजीजू यांनी बेकायदा स्थलांतरीत मायदेशी पाठविण्याच्या मसुद्यावर सही केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिलच्या लंडन दौऱयात या सामंजस्य करारावर सह्या होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारमधील काही जणांनी बेकायदा स्थलांतरीताच्या मुद्यावर काळजी व्यक्त केल्यानंतर हा अंतिम करार प्रलंबित राहिला आहे.