पाकड्यांना युएनमधील खोटा प्रचार भोवणार

सामना ऑनलाईन । जिनिव्हा

संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये पाकड्यांनी जखमी महिलेचा खोटा फोटो दाखवत हिंदुस्थान कश्मीरमध्ये अत्याचार करत असल्याचा आरोप केला होता. मात्र पाकड्यांनी पॅलेस्टिनी महिलेचा फोटो दाखवत हिंदुस्थानवर आरोप केल्याचे उघड झाल्याने पाकड्यांची तंतरली होती. पाकड्यांचा हा खोटेपणा आता त्यांना भोवणार आहे.

पॅलेस्टिनी महिलेला कश्मिरी दाखवले, युएनमध्ये पाकड्यांचा खोटेपणा उघड

संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अँटेनिया गुतेरस यांनी पाकिस्तानचे जागतिक स्तरावर खोटेपणाचे वागणे गंभीरतेने घेतले आहे. पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांच्या राजदूत मलीहा लोधी यांनी खोटा फोटो दाखवत हिंदुस्थानवर केलेल्या आरोपांवर संयुक्त राष्ट्रांकडून कारवाई होऊ शकते असे गुतेरस यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सभेत हिंदुस्थानने पाकिस्तानचा उल्लेख ‘टेररिस्तान’ केल्याने पाकडयांना मिरची झोंबली होती. शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणातून पाकड्यांच्या दहशतवादाचा बुरखा टराटरा फाडला होता. त्याला उत्तर म्हणून रविवारी पाकड्यांनी एका जखमी मुलीचा फोटो दाखवत हिंदुस्थानवर गंभीर आरोप केला होता. मात्र थोड्यात वेळात पाकड्यांचा खोटेपणा उघड झाला होता. पाकड्यांनी दाखवलेला फोटो हिंदुस्थानी महिलेचा नाही तर एका पॅलेस्टिनी महिलेचा होता. त्यानंतर जगभरातील मीडियाने पाकड्यांचा समाचार घेतला होता.